आमच्या विषयी

        विवेकनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व लोकशाही ही मूल्यनिष्ठा ठेवून पुणे येथील समाज प्रबोधन संस्था १९५९ पासून ग्रंथप्रकाशन, शिबिरे-परिसंवाद, ग्रामीण समस्यांचे अभ्यास-संशोधन, या मार्गांनी महाराष्ट्रात वैचारिक जागृतीचे कार्य करीत आहे. सद्य:स्थितीतील ज्वलंत प्रचलित समस्यांवर जागरूक मंडळींमध्ये सातत्याने चर्चा चालावी आणि अशा मंडळींची एक बैठक निर्माण व्हावी. या हेतूने समाज प्रबोधन संस्था 'समाज प्रबोधन पत्रिका' प्रकाशित करते. समाज प्रबोधन संस्थेत सर्व विचारांची, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मंडळी वैचारिक जागृतीचा एक व्यापक व पायाभूत कार्यक्रम पार पाडण्यासाठी एकत्र आलेली आहेत. ‘समाज प्रबोधन पत्रिका’ समाज प्रबोधन संस्थेने चालविलेली असली तरी ते संस्थेचे अधिकृत मुखपत्र नाही. वर उल्लेखिलेल्या व्यापक निष्ठांच्या चौकटीत राहून 'समाज प्रबोधन पत्रिके'चे कार्य स्वतंत्रपणे चालते. ‘समाज प्रबोधन पत्रिके’तील लेखांत व्यक्त झालेली मते ही ज्या त्या लेखकांची असून संस्था त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.

Read More